⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | Gold-Silver Rate : सलग पाचव्या दिवशी चांदी स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Gold-Silver Rate : सलग पाचव्या दिवशी चांदी स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । लग्नाच्या मोसमात तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसात सोने दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, आज सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव (Jalgaon) सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात ६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात ७८० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ३९० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी २९० रुपयाने घसरली होती.

आजचा सोने- चांदीचा भाव
शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,४६० रुपये इतका आहे. तर चांदी ६५,४२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठीघसरण दिसून येतेय. पाच दिवसात सोने १३५० ते १४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, गेल्या मार्च महिन्यात ५५ हजारांवर गेलेल्या सोन्याच्या भावात सध्या मोठी घसरण झालेली दिसून येतेय. ९ मार्चला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

सध्या लगनसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते, या धातूंची मागणी वाढल्याने दर वाढू शकतात. मात्र, सध्या बाजारात सोन्यासह चांदीचे दर देखील घसरत आहे. यामुळे सोने चांदीची ही चांगली संधी आहे.

या आठवड्यातील दर
सोने : जळगावमध्ये २५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,४९० रुपये होते. २६ एप्रिल रोजी ५२,६००, २७ एप्रिल रोजी ५२,७९० तर २८ एप्रिल रोजी ५२,४०० प्रति तोळा इतका आहे.
चांदी : तर दुसरीकडे २५ एप्रिल रोजी चांदी दर ६८,११०, २६ एप्रिल ६६,६४०, २७ एप्रिल ६६,४९० तर २८ एप्रिल ला ६६,२०० प्रति किलो इतका होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.