⁠ 
रविवार, मे 19, 2024

सोने पुन्हा 62 हजारावर, चांदीही महागली ; दिवाळीपर्यंत सोने गाठणार विक्रमी पातळी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचे पडसाद सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आले. सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याच्या (Gold Rate) दरात सातत्याने वाढ होत आह. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याचा भाव ६२००० च्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय चांदीचा (Silver Rate) भाव ७२ हजारांच्या पातळीवर पोहोचला आहे. Gold Silver Rate Today

जळगावच्या सुवर्णनगरीत युद्धापूर्वी सोन्याचा दर ५७ हजारावर होता तर चांदीचा दर ६८५०० रुपयावर होत. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून येतेय. दुसरीकडे चांदी चार हजार रुपयांपेक्षा अधिकने वधारली आहे. जळगावात सध्या सोने ६२ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

हमास-इस्त्रायल युद्ध व जागतिक पातळीवरील अस्थिरता यामुळे शेअर बाजारावर परिणाम होण्यासह सोने-चांदीच्याही भावात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.

धनत्रयोदशीला अवघे काही दिवस उरले असून, या दरम्यान सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, अनेक ज्वेलर्स सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला कमी किमतीत दागिने खरेदी करण्याची संधी आहे. त्याचबरोबर ग्राहकांना सणासुदीच्या काळात हॉलमार्किंग आणि शुद्धतेशी संबंधित अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतील.