⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आज सोने झाले स्वस्त, नवे दर जाणून घ्या

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आज सोने झाले स्वस्त, नवे दर जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । अमेरिकेसह युरोपातील बँकांच्या दिवाळखोरीचा परिणाम सोने चांदीच्या किमतीवर दिसून आला. सोन्याने एकदम उसळी घेतली आहे. तर चांदीच्या किंमती पण सूसाट आहेत. मात्र आज मंगळवारी या दरवाढीला ब्रेक लागला. आज सकाळी जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. तर चांदीचा दर स्थिर आहे. Gold Silver Rate Today

आज मंगळवारी जळगाव सुर्वण नगरीत सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,२०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल सोमवारी सायंकाळी सोन्याचा दर ५९,६०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात काही तासात ४०० रुपयाची घसरण दिसून आहे. १५ मार्चपासून विचार करता सोन्यात प्रति तोळा आज जवळपास १३०० रुपयांची घसरण झाली आहे. मात्र यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर ६५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

आजचा चांदीचा दर
चांदीच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास चांदीचा दर आज स्थिर दिसून येत आहे. काल सोमवारी सकाळी चांदीचा दर ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात होता. आज देखील त्याच भावात विकले जात आहे. मात्र काही दिवसात चांदीने जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या १५ दिवसापूर्वी चांदीचा दर ६४ हजारावर होता. मात्र त्यात आतापर्यंत ६ हजार रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
(वरील सोने चांदीचे दर जीएसटी वगळून आहेत.)

महिन्याभरात सोने ४ हजार रुपायांनी वधारले
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर ५५,००० रुपयांवर पोहोचला होता. पण आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते ५९,००० च्या आसपास चालू आहे. म्हणजेच एका महिन्यातच सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीअखेर चांदी ६१,००० रुपयांच्या पातळीवर घसरली. मात्र आता त्यातही तेजी दिसून येत असून सुमारे ७० हजार रुपयांचा व्यवसाय करत आहे. जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे.

असा देतात हॉलमार्क
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.