जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । अमेरिकेतील घडामोडीचा परिणाम मौल्यवान धातूंवर झालेला पाहायला मिळत असून दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. एक आठवडा वगळता जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी जोरदार घौडदोड केली. या महिन्यातील १ जुलै पासून ते आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळपास १५०० ते १७०० रुपयाची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत तब्बल ४००० ते ४५०० हजार रुपयांनी वधारले आहे.
सध्या सोन्याचा दर ६० हजारांवर गेला आहे. २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५५,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६०,३०० रुपयावर गेला आहे. दुसरीकडे चांदीने भरारी घेतली. एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी ७६,००० रुपये झाला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने १८० रुपयांनी वाढून ५९,१२९ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर ११५ रुपयांनी वाढून ७३,८७२ रुपयावर व्यवहार करत आहे.
किंमती मिस्ड कॉलवर
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.