⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सोने-चांदीच्या किमतीत 4 हजारांपेक्षा अधिकची वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२३ । गुरुवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. त्यानंतर आजही सराफा बाजार हिरव्या निशाणीने उघडला. सोने-चांदी या दिवाळीपूर्वी धमाका करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील गेल्या 24 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 4 हजारांपेक्षा अधिकची वाढ दिसून आली. चांदीच्या किमतीतही मोठी वाढ दिसून आलीय. यामुळे आता दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

या महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,750 रुपये होता. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,530 रुपये होती. तर 26 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,950 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,110 रुपये आहे. या काळात सोन्यात 4,580 रुपयांची वाढ दिसून आली. 3 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदी 71,000 रुपये होती. तर 26 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदीचा भाव 75,100 रुपये होता. चांदीत 4100 रुपयांची वाढ झाली.

दरम्यानं दुसरीकडे आज शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने 0.03 टक्क्यांनी म्हणजेच 17 रुपयांच्या वाढीसह 60,969 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव येथे 0.30 टक्क्यांनी म्हणजेच 212 रुपयांच्या वाढीसह 71,792 रुपयांवर ट्रेंड करत आहे.