जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । मागील काही दिवसापासून सोने (Gold) आणि चांदीचे दर वरखाली होत आहे. आज बुधवार सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीचा दर जाहीर झाला आहे. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट सोन्याच्या भावात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,574 रुपयावर पोहोचला आहे. Gold Silver Rate Today
मात्र दुसरीकडे आज चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव 155 रुपयांनी घसरून 54,560 रुपयांवर आला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 54,605 रुपयांवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्यामुळे लवकरच भावात घसरण दिसून आली. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.28 टक्क्यांनी घसरत आहे.
महाराष्ट्रातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,160 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे. तर जळगावात सोने दर 51,300 रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
सोन्याचे भविष्य काय आहे
सध्या सोन्यावर दबाव असला तरी महागाई आणि मंदीचा धोका कमी होताच सोन्याला पुन्हा एकदा गती येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, या वर्षाच्या अखेरीस सोने 54 हजारांची पातळी राखू शकते. मात्र, त्यांनी बाजारातील अस्थिरतेचाही उल्लेख करून घसरण झाल्यास सोन्याचा भाव 48 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे सांगितले.