सोने पुन्हा महागले! आजचा काय आहे प्रति तोळ्याचा भाव? घ्या जाणून..
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । लग्नसराईचे दिवस सुरु असून या दरम्यान, सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसत आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सततच्या दरवाढीने सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 55 हजाराच्या नजीक पोहोचला आहे. तर चांदीचा भाव देखील 69,000 रुपयांच्या वर गेला आहे. Gold Silver Rate Today
आज, मंगळवार, 27 डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 0.28 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
मंगळवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (गोल्ड रेट टुडे) कालच्या बंद किमतीपासून सकाळी 10.30 पर्यंत 63 रुपयांनी वाढून 54,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. काल MCX वर सोन्याचा भाव 109 रुपयांच्या वाढीसह 54,683 रुपयांवर बंद झाला.
चांदीही महागली
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात तेजी आली आहे. चांदीचा दर आज 317 रुपयांनी वाढून 69,392 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीचा दर आज 69,279 रुपयांवर उघडला. मात्र नंतर त्यात वाढ झालेली दिसून येतेय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव वधारले
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.34 टक्क्यांनी वाढून 1,804.75 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत आज 0.61 टक्क्यांनी वाढून 23.89 डॉलर प्रति औंस झाली आहे.
स्पॉट मार्केटमध्ये तेजी होती
गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. गेल्या व्यापार आठवड्याच्या सुरुवातीला (19 डिसेंबर ते 23 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 54,248 रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी 54,366 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 66,898 रुपये होती, जी शुक्रवारपर्यंत 67,822 रुपये प्रति किलोवर गेली.