जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । दसऱ्यानंतर आता दिवाळी (Diwali 2023) सणाला दोन आठवड्याचा कालावधी उरला आहे. या काळात अनेक लोक दागिने खरेदी करतात. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून विनाजीएसटी 57 हजार रुपये प्रति तोळ्यावर आला होता. तर चांदीचा दर 68 हजारांवर आला होता. यामुळे दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंचे दर आणखी स्वस्त होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र इस्त्राईल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या किमतींनी पुन्हा उच्चांक गाठला आहे. Gold Silver Rate Today
मागील गेल्या वीस दिवसात सोन्याच्या किमतीत जवळपास 4300 ते 4500 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीत जवळपास 5000 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. आता दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंच्या किमती कुठवर जातात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
यापूर्वी गेल्या वीस दिवसापूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 57500 रुपयावर विकला जात होता, तर चांदीचा प्रति किलोचा दर 68000 रुपयावर होता. मात्र सात तारखेपासून इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाले. या युद्धाचे पडसाद दोन्ही धातूंवर दिसून आले.
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या कितमीत वाढ होत असून यामुळे दिवाळीसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोडांचे पाणी पळाले आहे. पुढील महिन्यापासून दिवाळी सण यानंतर लग्नाची धामधूम सुरु होईल. याकाळात सोने चांदीला मागणी असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविला आहे.
जळगावमधील सोने चांदीचा दर
जळगावमध्ये सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर 56,300 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 61,800 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 73000 रुपये प्रति किलोवर गेला आहे.