जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । सध्या सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळाले परंतु गेल्या तीन महिन्यांप्रमाणे जून महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी कोणताही विक्रम नोंदवला नाही. दरम्यान, आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये थोडीशी घसरण दिसून आली. बाजार उघडताच सोन्याच्या दरात ७७ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्याचबरोबर चांदी देखील ७३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सोन्याच्या दरात ७७ रुपयाची घसरण दिसून आली. त्यामुळे १०ग्रॅमचा भाव ७१,३९० रुपयावर पोहोचला आहे. तसेच दुसरीकडे चांदीचा दर ७३ रुपयांनी वाढून ८६,८६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
जळगावसुवर्ण पेठेतील दर?
आज जळगावच्या सराफा बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ६६,०९० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७२,१०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ८९००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दरम्यान, सध्या आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ८० हजार रुपयावर तर चांदीचा दर १ लाखावर जाईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.