⁠ 
रविवार, मे 5, 2024

Gold Silver Today : सोने-चांदीच्या घौडदौडाला अखेर ब्रेकल ; आता १० ग्रॅमसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागतील..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । जागतिक घडामोडीमुळे सोने (Gold Rate) आणि चांदीची (Silver Rate) किमत एका विशिष्ठ पातळीवरून वर खाली होत आहे. गेल्या आठवड्यात वाढ झालेल्या दोन्ही धातूंच्या किमतीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. ६० हजारावर गेलेला सोन्याचा दर आता ५९ हजाराच्या घरात आला आहे. तर चांदीच्या किमतीत देखील घसरण झाली आहे.

काय आहे जळगावातील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,६०० रुपये इतका आहे. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५९,५०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ५९,७०० रुपये इतके होते. तर दोन-तीन दिवसापूर्वी सोन्याचा दर ६०३०० रुपयावर होता. मात्र यात गेल्या दोन दिवसात सोन्याच्या किमतीत ८०० रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळतेय.

दुसरीकडे गेल्या आठवड्यात चांदीचा दर विनाजीएसटी ७६३०० रुपयांवर गेला होता. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यात घसरण झालेली दिसून आली. जळगावात सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७४५०० रुपये आहे. दोन तीन दिवसात चांदीच्या किमतीत जवळपास ७०० ते ८०० रुपयाची घसरण झालेली दिसतेय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
काल भारतीय बाजारपेठेत खालच्या बाजूने किरकोळ विक्री झाल्यानंतर, मंगळवार, २५ जुलै रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये वाढ झाली आहे.आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने किंचित वाढून ५९,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर १५५ रुपयांनी वाढून ७४,२५१ रुपयावर व्यवहार करत आहे.