---Advertisement---
वाणिज्य

Gold Silver Rate Today : सोने-चांदी पुन्हा जमिनीवर, पहा आजचे दर..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । जागतिक बाजारातील घडामोडींचा फटका सोने-चांदीला बसला. मागील गेल्या 20 दिवसांत दरवाढीचे सत्र सुरु होते. सोने-चांदी भावात नवीन रेकॉर्ड करण्याची आशा होती. मात्र, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.21 जुलैपासून ते आतापर्यंत, एका आठवड्यात सोने-चांदीला चमकदार कामगिरी करता आली नाही. जर तुम्हीही आज सोने चांदी खरेदीला जाणार असाल तर त्याआधी आजच्या नव्या किमती जाणून घ्या..

gold 6 jpg webp webp

काय आहे जळगावातील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,५०० रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात २२ कॅरेट सोन्याच्या किमतीने ५६ हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र त्यात पुन्हा घसरण झाली. दरम्यान, सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५९,५०० रुपयांवर आला आहे.

---Advertisement---

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास जळगावात सध्या विनाजीएसटी ७४,७०० रुपये प्रति किलो इतका आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात चांदीचा दर ७६००० हजारांवर गेला होता. त्यात आतापर्यंत १५०० ते २००० हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
आज बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने किंचित वाढलेले दिसत असून दुसरीकडे चांदी मात्र किंचित घसरली आहे. आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने ८७ रुपयांनी वाढून ५९,२७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर ५५ रुपयांनी घसरून ७४,७२० रुपयावर व्यवहार करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---