जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । सोने चांदी (खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज मंगळवारी जळगाव सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल ८९० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने ५३ हजाराखाली आले आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या भावात १४७० रुपयाची घसरण झाली आहे.त्यामुळे प्रति किलो चांदीचा भाव देखील ६६ हजारांवर आले आहे. त्यापूर्वी काल सोमवारी सकाळच्या सत्रात सोने १५० रुपयाने तर दुसरीकडे चांदीच्या दरात ५९० रुपयाची घसरण झाली होती. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात एक हजाराहून अधिक रुपयाची घसरण झाली आहे.
आजचा सोने- चांदीचा भाव
मंगळवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,६०० रुपये इतका आहे. तर चांदी ६६,६४० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर घसरताना दिसून येताय. दरम्यान, सध्या लगनसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोन्याला मोठी मागणी असते, सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढू शकतात. तसेच रशिया आणि युक्रेयुद्ध सुरूच राहिल्यास त्याचा देखील मोठा परिणाम हा सराफा बाजारपेठेवर झाल्याचे पहायला मिळू शकते.
गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने ४ वेळा स्वस्त झाले आहे. तर एक वेळा महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही ४ वेळा घसरण तर एक वेळा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी २४०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर दोन दिवसात सोने १०५० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी २०६० रुपयाने स्वस्त झाली आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने दरात मोठी वाढ दिसून आली. रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.
गेल्या आठवड्यातील दर
जळगावमध्ये १८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,२३० रुपये होते. १९ एप्रिल रोजी ५४,५२०, २० एप्रिल रोजी ५३,९९० तर, २१ एप्रिल ५३,८६०, २२ एप्रिल ५३,६४० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे १८ एप्रिल रोजी चांदी दर ७०,६५० प्रति किलो होती. १९ एप्रिल ७१,६२०, २० एप्रिल ७०,३८० तर २१ एप्रिल ला ७०,०१०, २२ एप्रिल ६८,७०० रुपये प्रति किलो इतका होता.