जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) दरात सतत चढ-उतार होत असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर उशीर करू नका, कारण सोन्या आणि चांदीची किंमत उच्च पातळीच्या दरापेक्षा कमी झाली आहे. Gold Silver Rate Today
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सराफा बाजारात मंदीचे वातावरण होते आणि सोन्या-चांदीने घसरणीसह व्यवहार सुरू केला. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 60 रुपयांची घसरण नोंदवली गेली, तर चांदीच्या दरात प्रति किलो 120 रुपयांची घट झाली.
यासह देशात सोन्याचा (22 कॅरेट) भाव 54,258 रुपये प्रति दहा ग्रॅमवर घसरला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,190 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर भारतात चांदीची किंमत 73,240 रुपये प्रति किलो झाली आहे.
मल्की कमोडिटी एक्सचेंजवरील दर
दुसरीकडे, मल्की कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर आज सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा दर 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 58,886 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीची किंमत 0.16 टक्क्यांनी म्हणजेच 116 रुपयांनी घसरून 73,221 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,550 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा 54,410 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,450 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 73,600 रुपयावर गेला आहे.