⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सोने-चांदी विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत ; काय आहे आजचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली असून याच दरम्यान, सराफ बाजारात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येतंय. सोने-चांदीच्या यापूर्वीचा उच्चांक गाठण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

सोने 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहे. हा रेकॉर्ड लवकरच मोडण्याची शक्यता आहे. सोने गेल्या 10 दिवसांत 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 22 नोव्हेंबर रोजी भावा स्थिर होता. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दोन आठवड्यात गुंतवणूकदारांची चांदी झाली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.