⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोन्यातील दरवाढ थांबेना ! सोने-चांदी पुन्हा महागली, वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । सलग तिसऱ्या सत्रात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोबतच चांदी देखील वाधरली आहे. सततच्या दरवाढीने सोन्याच्या दर पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी ६९० रुपये प्रति किलोने महागली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ८० रुपयाने महागले होते तर चांदी ११० रुपायांनी स्वस्त झाली होती.

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज बुधवारी सोने प्रतीताेळा ५२,३६० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६३,४३० रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

मागील गेल्या काही दिवसापासून सोने दर वाढू लागले आहे. यापूर्वी तीन ते चार आठवड्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. मार्च महिन्यात ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत गेलेला सोन्याचा दर गेल्या आठवड्यात ५१ हजारांवर आला होता.तर मार्च महिन्यात ७२ हजारांवर असलेला चांदीचा भाव गेल्या काही दिवसापूर्वी ६० हजारांवर आले होते.

परंतु कोरोना महामारीनंतर आता जगासमोर मंकीपॉक्स विषाणूने संकट उभं केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉटिडी बाजारात सोन्यासह चांदीच्या किंमतीत तेजी दिसून येतेय. देशांतर्गत बाजारात गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर महागत असल्याचे दिसतंय. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. यामुळे सोन्याच्या भावाने ५२ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तीन दिवसात सोने ६३० रुपयाने महागले आहे. दुसरीकडे चांदी ४२० रुपयाने महागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६०प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.