सोने 65 हजार तर चांदी 80 हजाराचा टप्पा गाठणार? आजचा दर तपासून घ्या..

मार्च 25, 2023 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीत जबरदस्त वाढ दिसून आली. अडीच वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये ५६,२०० चा विक्रम करणाऱ्या सोन्याने यावेळी ६०,००० चा टप्पा पार केला आहे. मात्र आता तो काहीसा घसरला असून ५९ ते ६० हजारांच्या दरम्यान प्रवास करत आहे. येत्या काळात सोने ६५,००० रुपयांचा विक्रम करू शकतो, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही ८०,००० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

जळगाव सुर्वण नगरीतील भाव?
अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगाचा शेअर बाजार हादरून गेला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जळगाव सुर्वण नगरीत या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोबतच चांदीची चांगलीच वधारली आहे. मात्र कालच्या किमतीपेक्षा आज सोनं २०० रुपयांनी घसरले आहे. आज शनिवारी सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,६०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल शुक्रवारी ५९,८०० रुपये इतका होता.

आजचा चांदीचा दर
दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. आज चांदीचा एक किलोचा दर ७०,५०० रुपये इतका आहे. यापूर्वी तो ७०,००० रुपये इतका आहे.मात्र, येत्या काळात चांदीचा दर ८० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीमध्ये इतका होता दर
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव ५५,००० रुपयांच्या आसपास खाली आला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही ७१००० रुपयांवरून घसरून ६२ हजाराच्या घरात पोहोचला होता. पण त्यात पुन्हा जबरदस्त उडी मारली गेली आणि आता थोडी नरमाई येत आहे. जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे. दिवाळीत सोने-चांदी नवा विक्रम करू शकतात, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now