⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सोने-चांदी पुन्हा सुसाट ; खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी वाचा आजचा प्रति ग्रॅमचा भाव..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । अमेरिकन बाजारात सध्या घडामोडी घडत असून याचा परिणाम सोने चांदीच्या किमतीवर दिसून येतोय. भारतीय सराफा बाजारात चढ-उतार सुरूच असून, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदी चमकले होते. त्यानंतर सलग घसरणीचे सत्र सुरु होते. मात्र या आठवड्यात घसरणीच्या सत्राला ब्रेकच लागला. मागील दोन तीन दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ झालेली दिसून आली. जुलै महिन्यातील दरवाढीचा राग सध्या या आठवड्यात या धातूंनी आळवला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर?
दरम्यान, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सराफा बाजार लाल चिन्हाने उघडला आणि सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 70 रुपयांनी तर चांदीच्या दरात 170 रुपयांनी घट झाली. यानंतर सोन्याचा (22 कॅरेट) भाव 53,983 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,890 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला.

तर चांदीचा भाव 73,730 रुपये प्रति किलो झाला आहे. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांनी घसरून 58,754 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आहे. तर चांदीची किंमत 0.26% कमी झाली म्हणजे 191 रुपये प्रति किलो 73,377 रुपये.

तर गुडरिटर्न्सनेच्या आकडेवारीनुसार या आठवड्यात सोन्याने सूसाट धाव घेतली असून या महिन्यात सोन्यात 1, 5 ऑगस्ट नंतर या चार दिवसांत भाव वधारले. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 23 ऑगस्ट रोजी भावात 180 रुपयांची वाढ झाली. 24 ऑगस्ट रोजी सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला चांदी घसरली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. आता 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या. आता 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.