⁠ 
रविवार, मे 5, 2024

सोने-चांदीच्या वाढत्या दराने ग्राहकांना फुटला घाम ; आज पुन्हा वाढले भाव, हे आहेत नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । लग्नसराईचा हंगाम सुरू होताच भारतीय सराफा बाजारात तेजीचा कल सुरू झाला आहे. मागील काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम नक्कीच फुटणार. दोन्ही धातूंचे दर कुठवर जाणार याकडे आता खरेदी ग्राहकांचे लक्ष लागून राहणार आहे. Gold Silver Rate Today

आज शुक्रवारीही सराफा बाजार उत्साहाने उघडला. यासह सोने 61 हजारांच्या जवळ गेले तर चांदी 73 हजारांच्या वर व्यवहार करत आहे, 24 नोव्हेंबरच्या सकाळी सोन्याच्या दरात 60 रुपयांनी तर चांदीच्या दरात 70 रुपयांची वाढ झाली. यासह भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,302 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,420 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीचा भाव 73,320 रुपये प्रति किलो झाला.

MCX वर सोन्या-चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 59 रुपयांच्या वाढीनंतर 61,131 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. तर चांदीचा भाव येथे 0.10 टक्क्यांनी वाढून 71 रुपयांनी 72,969 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

सध्या आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 76,200 रुपये आहे.दरम्यान, 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची भरारी घेतली. तर सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली.