---Advertisement---
वाणिज्य

ग्राहकांना मोठा दिलासा! सोने-चांदी झाली स्वस्त, आताच नवीन दर पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । गेल्या दीड महिन्यापूर्वी सर्वकालीन उच्चांकावर पोहचलेल्या सोने आणि चांदीचा भाव आता उतरला. सोन्याच्या (Gold Rate) किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचा दर आता 59 हजाराखाली आला आहे. तर चांदीचा (Silver Rate) दर 69 हजारावर आलीय.

gold 6 jpg webp webp

या वर्षीच्या मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर विनाजीएसटी 62 हजाराचा टप्पा ओलांडला होता. यामुळे सर्वसामान्यांना धडकी भरली होती. चांदीचा किमतीने देखील 77 हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे सोने-चांदी आता सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेले होते. पण नवनवीन रेकॉर्ड करणारे दोन्ही मौल्यवान धातून पुन्हा एकदा स्वस्त झाले आहे.

---Advertisement---

काय आहे आजचाजळगावातील सोन्याचा दर?
जळगावात सध्या 22 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव विनाजीएसटी 53,680 रुपये प्रति तोळा इतका आहे. त्याचबरोबर सध्या 24 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,600 रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 59,000 रुपयावर होता. म्हणजेच यात 400 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

पाच दिवसात सोने इतक्या रुपायांनी घसरले?
दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 जून रोजी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 59,800 रुपये इतका होता. आतापर्यंत तब्बल 1200 रुपयांहून अधिकची घसरण झालेली दिसून येतेय.

चांदीचा दर
जळगावमध्ये सध्या चांदीचा दर विनाजीएसटी 69000 खाली विकला जात आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 70000 रुपयावर विकला जात होता. तर सोमवारी (19 जून) चांदीचा दर 73500 रुपये इतका होता. त्यात पाच दिवसात तब्बल 4500 रुपयांहून अधिकची घसरण झालेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---