⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जागतिक घडामोडीचा असाही परिणाम ; आज काय आहे सोने-चांदीचा भाव? पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । अमेरिकन बाजारातील घडामोडींचे भारतीय सराफा बाजारात पडसाद उमटत आहे. मे जून महिन्यात घसरण होऊन सोन्याचा (Gold Rate) भाव थेट 58,000 रुपयांवर तर चांदी (Silver Rate) 70,000 रुपयांपर्यंत आला होता. मात्र या महिन्यात दोन्ही धातूंच्या किमतीने उसळी घेतली आहे. सोन्याने म्हणता म्हणता पुन्हा 60 हजारांचा पल्ला गाठला. पण गेल्या दोन दिवसांत दोन्ही धातूत पुन्हा घसरण दिसून आली. काय आहे सोने-चांदीचा भाव?

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत ११० रुपयाची घसरण झाली असून यामुळे आता सोने ५९,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर देखील ३१५ रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदीचा दर ७४,६५६ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,७०० रुपये इतका आहे. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५९,७०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ६०३०० रुपये इतके होते. त्यात ३०० रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७४,८०० रुपयावर विकला जात आहे. यापूर्वी शनिवारी चांदीचा दर ७६३०० रुपये इतका होता. एकंदरीत दोन दिवसात चांदीच्या किमतीत १५०० रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे.

दरम्यान, या महिन्यात सोन्याने २००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने ४००० ते ४५०० रुपयांची झेप घेतली आहे.