सोन्याच्या किमतीने आज नवा विक्रमी उच्चांक गाठला ; वाचा प्रति तोळ्याचा दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२३ । सोने आणि चांदी (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोन्याने आज नवा विक्रमी उच्चांक गाठला असून भारतीय बाजारात मौल्यवान सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना आता जास्त खर्च करावा लागेल. आज व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सोन्याने ५७ हजार रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याची किंमत 0.42 टक्क्यांनी वाढली आहे. सोबतच चांदी देखील 0.55 टक्क्यांनी वाढली आहे.

काय आहे आजचा सोन्याचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याची किंमत 241 रुपयांनी वाढले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,056 रुपायांवर व्यवहार करत आहे.

चांदीचे दर काय?
चांदीच्या दरातही आज तेजीने व्यापार होताना दिसत आहे. चांदीची किंमत गेल्या बंदच्या तुलनेत 436 रुपयांनी वाढून 68,400 रुपये प्रति किलोवर गेली आहे. लक्षात घ्या की गेल्या आठवड्यात चांदीने 70 हजार रुपयांची पातळीही ओलांडली होती, मात्र आता त्या पातळीवरून किंमतींत घसरण झाली आहे.

सोने-चांदीच्या तेजीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने आणि चांदीच्या दरात तेजीने व्यवसाय होत आहे. आज कोमॅक्सवर सोन्याचा भाव 5.55 डॉलर किंवा 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 1934.95 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत असताना चांदीची चमकही वाढली आहे. कोमॅक्सवर चांदी ०.४२ टक्क्यांनी वधारून 23.652 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.