⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

स्वस्तात खरेदीचा योग! सोने-चांदी किमतीत मोठी घसरण, पहा आजचे भाव..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदविली गेली होती. या आठवड्यातही एक दिवसाआड भावात मोठा बदल होत होता. भावातील चढउतारामुळे ग्राहकांना मौल्यवान धातू खरेदीची योग्य संधी गवसत नव्हती. पण आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना स्वस्तात खरेदीची योग जुळून आला.

गेल्या दोन दिवसांत सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली असून यामुळे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उच्चांकापासून आतापर्यंत सोने 1800 ते 2000 रुपयापर्यंत घसरले तर चांदी 6500 रुपयांपेक्षा जास्तने घसरली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली होती. त्यावेळी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 64,300 (विनाजीएसटी) पर्यंत गेला होता. तर चांदीचा एक किलोचा दर 78000 हजार रुपये (विनाजीएसटी)पर्यंत गेला होता, एकीकडे लग्नाची धामधूम सुरु असताना मौल्यवान धातूंमध्ये वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागली. मात्र जानेवारीनंतर या महिन्यात सोने चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

सोन्यात चढ-उतार :
या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी किंमती 300 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या. या आठवड्यात 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी महागले. 20 फेब्रुवारीला 100 रुपयांनी किंमती उतरल्या. 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी वधारले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. काल भावात अपडेट दिसली नाही. आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी मोठी घसरण झाली असून तर या दोन दिवसांत 1200 रुपयांनी किंमती उतरल्या. सध्या एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी 71500 रुपये आहे.