---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

व्वा…! सोने-चांदी झाले स्वस्त, आज भावात मोठी घसरण ; पहा नवीन दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२३ । अक्षय्य तृतीया, ईदच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. ऐन लग्नसराई व मुहूर्तांवर सोनं (Gold) खरेदी करणे खरेतर कठीणच झाले आहे. मात्र आता सोन्याच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशीही सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण पाहायला मिळते. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. यासोबतच जागतिक बाजारातून मंदीची चिन्हे दिसू लागल्याने देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. MCX वर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये सोने 59,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोने किती स्वस्त झाले ते पाहूया-

gold silver jpg webp webp

सोने-चांदी किती स्वस्त झाले?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह 59,785 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी चांदी 0.53 टक्क्यांनी घसरून 74,261 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे.

---Advertisement---

सोन्याचे भाव लवकरच वाढतील
अमेरिकेत फेड व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक बाजारात ही मंदी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात जागतिक बाजारात सोन्याच्या दरात १.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.

खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---