जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सराफा बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Price) घसरणीच्या सत्राला ब्रेक लावला. आगामी सणासुदीत सोने चांदीचे दर कमी होणार कि महागणार? याबाबत ग्राहक संभ्रमात आहे.
दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर शुक्रवारी सराफा बाजार हिरव्या चिन्हाने बंद झाला. या काळात दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. मात्र गुरुवारच्या तुलनेत सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यानंतर भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,285 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,220 रुपये होता.
तर भारतीय बाजारात चांदीची किंमत 73,340 रुपये प्रति किलो झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सोने 58,941 रुपये प्रति किलोवर बंद झाले, तर MCX वर चांदीची किंमत 73,350 रुपये प्रति किलो झाली.
जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्यात घसरण झालेली दिसून येतेय. मात्र चांदी पुन्हा वधारलेली आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,590 रुपये प्रति दहा ग्रॅम आह. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर आज शनिवारी हा दर 22 कॅरेट सोन्याचा 54,410 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,400 रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या पाच दिवसात सोन्याच्या किमतीत 200 ते 300 रुपयाची घसरण झालेली दिसून येतंय.
दुसरीकडे चांदीचा दर सोमवारी (18 सप्टेंबर) 72300 रुपये प्रति किलोवर होता. तो आज शनिवारी 73,300 रुपयावर गेला आहे. म्हणजेच चांदीच्या किमतीत तब्बल 1000 रुपयाची वाढ झालेली आहे.