जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । जर तुम्ही लग्नाच्या हंगामात सोने आणि चांदी खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घसरणीसह सोन्याचा दर ६० हजाराखाली आला आहे. Gold Silver Rate Today
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज मंगळवारी सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे.
काय आहे आज MCX वर सोने-चांदीचा दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा दर ३३६ रुपयांनी घसरून ६०,१९५ रुपयावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीच्या किमतीत ४७३ रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलोचा दर ७२,२६० रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगाव सराफ बाजारातील दर?
दुसरीकडे जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ आल्याने सोन्याचा दर पुन्हा ६१ हजारावर गेला. सध्या २२ कॅरेट सोन्याचा ५६,४०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. २४ कॅरेट सोने ६१,५०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ७३,२०० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे.
तुमच्या माहितीसाठी?
दरम्यान, सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केट ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. विविध शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केले जातात आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते मेकिंग चार्जेस लावून दागिन्यांची विक्री करतात.