जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । सोने दरात मागील तीन ते चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या घसरणीवर काहीसा लगाम लागला आहे. मागील काही दिवसापासून सोने वाढू लागले असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने पुन्हा महागले आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात १६० रुपयाची घसरण झाली आहे.
जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज सोमवारी सोने प्रतीताेळा ५२,०२० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६३,०१० रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वरखाली होत असल्याचे दिसून येताय. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. त्यात सोन्याचे दर पुन्हा वधारू लागले आहे.
जागतिक शेअर बाजारातील सततच्या घसरणीने सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळले आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे दर वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. आजच्या दरवाढीनंतर सोने दराने ५२ हजाराचा टप्पा पार केला आहे.
यापूर्वी १ मेला ५२५०० रुपायांवर असलेला सोन्याचा दर गेल्या आठवड्यात ५१ हजार रुपायांवर आला होता. तर दुसरीकडे चांदी ६५,५०० रुपायांवरून गेल्या आठवड्यात ६१ हजारांवर आला होता. गेला आठवड्यात सोन्या सह चांदीचे दर महागले आहे. त्यात मागील आठवड्यात पाच दिवसात चांदी तब्बल ३ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोने ६०० ते ७०० रुपयांनी महागले आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम
१९ मे २०२२ – रु ५१,४०० प्रति १० ग्रॅम
गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो
१९ मे २०२२- रुपये ६२,२०० प्रति किलो
शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.