जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रथमच ५९ हजारांवर गेला आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. मात्र ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच गुडी पाडव्याच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीत ५९ हजारांवर असलेला सोन्याचा दर ५८ हजाराच्या घरात आला आहे. Gold Silver Rate Today
आजचा जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर
जळगाव सुवर्णनगरीत आज बुधवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,४०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल सायंकाळी सोन्याचा दर भाव ५९००० रुपये इतका होता. म्हणजेच काही तासात सोन्याच्या भावात ६०० रुपयाची घसरण झाली आहे. मात्र गेल्या गेल्या सोमवारी सोन्याचा दर जवळपास ५७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. त्यात आतापर्यंत मोठी वाढ झालेली दिसून येतेय.
चांदीचा दर
दुसरीकडे आज चांदीचा एक किलोचा दर ६९,००० रुपये इतका आहे. यापूर्वी काल मंगळवारी सायंकाळी चांदीचा दर ६९,५०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात ५०० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी गेल्या सोमवारी चांदीचा दर ६४,२०० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत तब्बल ४५०० हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ११ सोन्याचा दर किंचित १५ रुपयांनी घसरला असून तो रुपयांनी वाढला असून ५८,५६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी १९० रुपयांनी वाढली असून ६८,५८२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.