जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रम १०० रुपयाने स्वस्त झालं आहे. सोबतच चांदीदेखील स्वस्त झाली आहे.आज चांदीच्या दरात ९०० रुपयाची घट झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. त्यामुळे सोने ४८ हजार रुपयांच्या घरात गेले आहे. सध्या लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७३९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,३९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५१३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,१३० रुपये आहे.
चांदीचा भाव
मागील काही दिवसापासून चांदीच्या दर देखील घसरताना दिसून येत आहे. आज चांदीच्या दरात ९०० घसरण झाली असून एक किलो चांदीचा भाव ७३,१०० रुपये इतका आहे.