सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; आजचा 10 ग्रॅमचा भाव किती? पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२३ । ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत वाढ दिसून आली. २ फेब्रुवारी सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोने ५८८०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत गेला होता. मात्र मागील काही दिवसापासून सोने किमतीत घसरण दिसून आली. आज बाजारातील तिसऱ्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झालीय. याशिवाय आज चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी असू शकते. आज सोन्याचा भाव 56 हजार रुपयांच्या आसपास आहे. आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे ते पाहूया.

MCX वरील आजचा दर?
MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित २० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५६,१५० रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत २३० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ६५,८८२ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,५०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,६०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६६,८०० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.