⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ग्राहकांना दिलासा : सोने 630 रुपयांनी, तर चांदी 1130 रुपयांनी घसरली

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । इराण-इस्त्राईल संघर्षानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदीने मोठी उडी घेतली आहे. सध्या सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात आज (सोमवार) भारतीय सराफा बाजारात मोठी घसरण दिसून आली.

आज 22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 630 रुपयांनी घसरला होता. तर चांदीचा भाव किलोमागे 1130 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,321 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 82,800 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.

MCX वर सोन्या-चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सध्या 0.83 टक्के म्हणजेच 606 रुपयांच्या घसरणीसह 72,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे. तर चांदीची किंमत 1.33 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे, म्हणजेच 1107 रुपयांनी आणि 82,400 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे.

जळगावात काय आहे सोने-चांदीचा दर?
सध्या मार्च महिन्यापासून देशात सोने आणि चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जळगावच्या सराफा बाजारात विनाजीएसटीसह सोन्याची किंमत 74000 पर्यंत आहेत. जीएसटीसह सोन्याचा दर 76000 रुपयावर आहेत. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी 84000 रुपये प्रति किलोवर आहे.