⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

खरेदीची ‘सुवर्णसंधी’ ! तीन दिवसात चांदी 2900 रुपयांहून अधिक स्वस्त, सोने दरातही मोठी घसरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २२० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल १३१० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्याआधी काल सकाळच्या सत्रात सोने १३० रुपायने तर चांदी ३७० रुपयाने स्वस्त झालं आहे.

जळगावातील आजचा प्रति तोळ्याचा भाव? Gold Silver Rate Today
शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,६४० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,७०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

सोन्या चांदीचे भाव हे दिवसातून दोनदा बदलतात. सकाळी मार्केट सुरू होताच भाव जाहीर होतात. तर दुसऱ्यांदा सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा एकदा भाव जाहीर केले जातात.

सध्या लग्न सराई सुरु असून यात सोन आणि चांदीच्या दरात मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे अनिश्चितता वाढत असल्याने नफेखोरी करून सोने-चांदीमधून पैसे काढून घेण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने दरात मोठी वाढ दिसून आली. रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

तीन दिवसात सोने ८८० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी २९०० रुपयांहून स्वस्त झाली आहे.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये १८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,२३० रुपये होते. १९ एप्रिल रोजी ५४,५२०, २० एप्रिल रोजी ५३,९९० तर, २१ एप्रिल ५३,८६० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे १८ एप्रिल रोजी चांदी दर ७०,६५० प्रति किलो होती. १९ एप्रिल ७१,६२०, २० एप्रिल ७०,३८० तर २१ एप्रिल ला ७०,०१० प्रति किलो इतका होता.