⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त, वाचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आलीय. मात्र दुसरीकडे चांदी आज पुन्हा महागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात २०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

आजचा MCX वरील भाव
आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत २१ रुपयांनी घसरून ४९, १५४रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदीचा एक किलोचा भाव १९२ रुपयांनी वाढला असून ५६,५३५ रुपायांवर व्यवहार करत आहे.

जळगावमधील दर
दरम्यान, जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ४६, ३५० इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ५०, ६०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव जवळपास ५७,५०० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७२ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.