⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा दर

सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या किंमती घसरू लागल्या आहे. जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने २१० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी ५८० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,६५० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,४७० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागील २० दिवसात सोने दरात जवळपास ४००० रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात ६५०० ते ७००० हजार रुपयाची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरू लागले आहे. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाचिया घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

जळगावमध्ये १४ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,१२० रुपये होते. तर १५ मार्च रोजी ५३,५३०, १६ मार्च रोजी ५२,७७०, १७ मार्च रोजी ५२,३५०, १८ मार्च ५२,८६० वर स्थिरावले आहेत. तर ७ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,७ ९०रुपये होते. तर ८ मार्च ला ५४,७७०, ९ मार्चला ५५,५५० असा होता. त्यानंतर हे दर सातत्याने घसरत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.