जळगाव जिल्हावाणिज्य

सोन्याच्या किमतीत पुन्हा उसळी! जळगावात प्रति तोळ्याचा भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । सोने-चांदीच्या दरात गेल्या डिसेंबरमध्ये तेजी असताना नवीन वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात घसरण झाली आहे. अधूनमधून सोने-चांदीने चमकदार कामगिरी दाखवली. आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी सोन्यात उसळी आल्याचे दिसून येते. Gold Silver Rate 21 January 2024

शुक्रवारी आणि शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. तर चांदीने शुक्रवारी उसळी घेतली तर शनिवारी भावात घसरण झाली. दोन दिवसांत सोने जवळपास ४५० रुपयांनी वधारले. तर चांदीत २०० रुपयांची घसरण दिसली. या दरवाढीने सोन्याच्या दराने पुन्हा ६३ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.

जळगाव सुवर्णनगरीत पंधरवड्या सोने प्रतितोळ्यामागे ११५० रुपयांनी तर चांदी प्रति किलोमागे १ हजार रुपयांनी घसरली आहे. जानेवारीत २ तारखेला सोन्याचे दर उच्चांकी ६४१५० (विना जीएसटी) वर गेले. तर चांदी ७५ हजार रुपये किलो होती. पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी १५ जानेवारीला सोने ६३ हजारांपर्यंत तर चांदी ७४ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

जळगावमधील आजचे भाव;
आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ५७,८०० रुपये इतका आहे. २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६३,१०० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ७२६०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button