⁠ 
शनिवार, मे 18, 2024

दसरापूर्वी सोने-चांदीने घेतली मोठी उसळी ; पहा आज किती रुपयांनी महागले?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । दसरा, दिवाळी (Diwali 2023) सारखे मोठे सण अगदी जवळ येऊन ठेपले आहे. याच दरम्यान, अनेक लोक दागिने खरेदी करतात. या महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत घसरण दिसून आली. सोन्याच्या किमतीत ७ महिन्याच्या नीच्चांकीवर आल्या होत्या. चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे सणासुदीत दोन्ही धातूंचे दर आणखी घसरण होण्याची शक्यता होती. मात्र इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली.

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात 59000 हजारांवर असलेल्या सोन्याच्या किमतीने 61 हजाराचा टप्पा गाठला आहे. चांदीने देखील 73000 हजाराचा टप्पा गाठला आहे. यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

आजचा दर?
जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 73,000 रुपयांवर गेला आहे.

दरम्यान, यापूर्वी गेल्या आठवड्यात (13 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 59000 रुपयावर होता. तर चांदीचा दर 70000 हजारांवर होता. मात्र गेल्या सात दिवसात सोने 2000 रुपयाने तर चांदी 3000 रुपयांनी वधारली आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
दरम्यान, आज शुक्रवारी सराफा बाजार हिरव्या चिन्हाने उघडला आणि दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 0.47 टक्क्यांनी म्हणजेच 282 रुपयांनी महाग होत आहे आणि 60,600 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव आता 0.38 टक्क्यांनी म्हणजेच 269 रुपयांच्या वाढीनंतर 71,885 रुपये प्रति किलोवर आहे.