⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

सोन्याने घेतली पुन्हा मोठी उसळी ; किमतीने ओलांडला ६० हजाराचा टप्पा, चांदीने..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । सोन्याच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. मे-जून महिन्यात घसरण झालेल्या सोन्याच्या किमतीने पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. मागील काही दिवसापूर्वी ५८ हजारावर घसरण झालेल्या सोन्याच्या किमतीने पुन्हा ६० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. Gold Silver Rate Today

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता २० जुलै पर्यंत सोने-चांदीत मोठी उसळी आली आहे. दोन्ही धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. या महिन्यात सोन्याने २००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने ६५०० रुपयांची झेप घेतली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत १५० रुपयांनी वाढून ५९,९४० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर १५३ रुपयांनी वधारला आहे. यामुळे एक किलो चांदीचा दर ७६,५६२ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीने ६० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५५,३०० रुपये इतका आहे. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६०,५०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७६,५०० रुपयावर विकला जात आहे.