⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आज सोने खरेदीला जाताय? घसरणीनंतर सोने पुन्हा महागले, फटाफट चेक करा आजचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२३ । अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत चढउतार होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण नोंदविण्यात आलीय. सलग तिसऱ्या आठवड्यात किमती घसरल्यामुळे भारतातील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजाराच्या खाली पडला आहे. मात्र, आज वायदे बाजारात सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत झालेली दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

MCX वरील आजचा दर?
MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित १० रुपयांनी वाढून 56,259 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत १०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 65,550 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्ण नगरीतील दर
सोन्याच्या महागड्या किंमतींमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह काहीसा थंडावलेला दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,७०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५६, ५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६७००० रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव असा होता?
IBJA दरांनुसार, गेल्या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 57,076 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी सोन्याचा भाव 57,025 रुपयांवर बंद झाला. बुधवारी 56,770, गुरुवारी सोन्याचा दर किंचित घसरला आणि तो 56,343 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. शुक्रवारी सोन्याचा दर 56,204 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या आठवडाभर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.

लग्नसराईत मागणी वाढण्याची शक्यता
देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून या काळात सोन्याच्या दागिन्यांची चांगली मागणी असते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.