⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर ! आठवड्याभरात चांदीची चमक ३४०० रुपयांनी उतरली, सोनेही घसरले

खुशखबर ! आठवड्याभरात चांदीची चमक ३४०० रुपयांनी उतरली, सोनेही घसरले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । सोने आणि चांदी दरातील चढ-उतार सुरूच आहे. मागील दोन ते तीन आठवडे सोन्याच्या भावात वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदी दरात देखील मोठी घसरली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Gold Silver Rate Today

काय आहे सोन्याचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,५०० रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ५२,४६० रुपये इतका होता. म्हणजे गेल्या आठवड्याभरात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या भावात जवळपास एक हजार रुपयाची घसरण झाली आहे.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

चांदीचा भाव?
MCX वर, चांदीचा भाव ५५,९५८रुपये प्रति किलो इतका आहे. गेल्या आठवड्यात चांदीचा भाव ५९,४२० रुपये प्रति किलोवर होता. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या भाव ३४०० ते ३४५० रुपयांनी घसरले आहे.

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,३०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९१० रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५२,७०० रुपये इतका आहे. म्हणजे गेल्या आठवड्यात सोने ४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर सध्या चांदीचा भाव ५७००० रुपये प्रति किलो इतका आहे. गेल्या आठवड्यात चांदीचा भाव ५९,७०० इतका होता. म्हणजे गेल्या आठवड्यात देखील २००० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.