‘या’ साप्ताहिक आठवड्यात सोने-चांदी स्वस्त कि महाग? त्वरित जाणून घ्या भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) उत्सव सुरु असून दसरा सण अवघ्या ३ दिवसांवर आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असल्यामुळे या निमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते. दरम्यान, अशातच तुम्ही जर सोने चांदी खरेदीची योजना आखात असाल तर आज आम्ही तुम्हाला आठवड्याभरात दोन्ही धातूंच्या दरात किती बदल झाला ते सांगणार आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर या आठ्वड्यात सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसून येतेय. सध्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 50,027 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. या आठवड्यात काही दिवस सोन्याच्या भावात घसरण दिसून आली होती.त्यावेळी सोन्याचा भाव 49,492 रुपयांवर बंद झाला. तर मंगळवार, 27 सप्टेंबर रोजी 49,351 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. बुधवारी किंचित वाढ झाली आणि सोन्याचा दर 49,368 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गुरुवारी सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली आणि तो 50 हजारांच्या पुढे जाऊन बंद झाला. तर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 50,027 रुपयावर गेला. Gold Silver Price Today
दुसरीकडे चांदीच्या भावातही या आठवड्यात वाढ दिसून आलीय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा प्रति किलोचा दर जवळपास 55,600 रुपये इतका होता. मात्र शेवटच्या सत्रात झालेल्या वाढीने चांदीचा प्रति किलोचा दर 56,868 रुपयावर गेला आहे. या आठवड्यात चांदीच्या भावात जवळपास 1100 ते 1200 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदी भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 51,300 रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तो 50,500 रुपये इतका होता. दरम्यान, सध्या चांदीचा दर 57,500 रुपये प्रति किलो इतका आहे. तो आठवड्याच्या पहिल्या दिवशी 56,800 रुपये प्रति किलो इतका होता. या साप्ताहिक व्यवहारात सोने जवळपास 200 ते 300 रुपयांनी तर चांदी 1100 ते 1200 रुपायांनीं घसरलेली दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.