⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Today : सोने-चांदीच्या दरवाढीची विश्रांती ; पहा आजचा प्रति ग्रॅमचा दर..

Gold Silver Today : सोने-चांदीच्या दरवाढीची विश्रांती ; पहा आजचा प्रति ग्रॅमचा दर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतींनी तुफान वेग घेतल्याने ग्राहकांच्या मनात धडधड वाढली होती त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूंचे दर कुठंवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून होते. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला सोने-चांदीच्या दरवाढीने थोडी विश्रांती घेतल्यास दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ६० हजारावर गेलेला सोन्याचा दर आता खाली आला आहे.

सोने आणि चांदीची दरवाढ किंवा घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलांसह कमी प्रमाणात वाढ होणे हे परिणाम करणारे घटक आहे. त्याचसोबत कमोडिटी बाजारपेठेचाही मोठा परिणाम दरांवर होत असतो. जळगाव सुवर्णगरीत सरत्या आठवड्यात चांदीच्या किमतीत तब्बल २००० रुपयाची घसरण झालेली दिसून आली. २७ जुलै रोजी ७६ हजारांवर असलेला चांदीचा दर आता ७४ हजारांवर आला आहे.

जळगावातील आजचे दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५४,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे.यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ५९१०० रुपयावर होता. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,८०० रुपयावर आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव सध्या विनाजीएसटी ७४००० रुपयापर्यंत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील (MCX) दर?
कमोडिटी एक्सचेंवर बाजाराच्या सुरुवातीलाच सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी १०. ३० वाजेपर्यंत सोन्याचे ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) २४४ रुपयांनी वाढून ५९ हजार १८३ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे १.९३% किंवा ३३६ रुपयांनी वाढून ७४ हजार २६९ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.