जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहे. दरम्यान, सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. जागतिक बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गेल्या दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे 1000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 60,000 च्या खाली आला आहे. सोबतच चांदीचा दरही घसरला आहे.
गेल्या तीन दिवसापूर्वी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सकाळच्या सत्रात सोन्याचा दर 60,950 रुपयापर्यंत होता. तो आता 60 हजाराखाली आला आहे. आज MCX वर सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा दर 59,775 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे.
दुसरीकडे मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर तीन दिवसापूर्वी चांदीचा दर 74,200 रुपये प्रति किलोवर होता. आता त्यात मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. आज MCX वर सकाळी 11 वाजेपर्यंत चांदीचा दर 72,513 रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात देखील गेल्या तीन दिवसात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 60,800 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी 16 मे 2023 रोजीच्या सकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 61,400 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. त्यात आतापर्यंत जवळपास 500 ते 600 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.
सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 72,500 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी 16 मेला चांदीचा दर 73,500 रुपयापर्यंत होता. त्यात आतापर्यंत 1000 रुपयांहून अधिकची घसरण झालेली दिसून येत आहे.
सोने-चांदीचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे.
अॅपद्वारे सोने खरे की बनावट तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.