वाणिज्य

ग्राहकांच्या खिशाला कात्री ; सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ.. तपासून घ्या आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असून यातच दुसरीकडे सोने, चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईवर दिसणार आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठा पल्ला गाठल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. आजचे भाव तपासून घ्या..

जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात १०० रुपयाची वाढ दिसून आली असून यामुळे सोन्याचा भाव विनाजीएसटी ६६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ७६५०० रुपये विनाजीएसटी इतका आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असलेल्या मोठा फटका ग्राहकांनी बसत आहे. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कमी कल दिसून येत आहे. 

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात या महिन्याच्या पहिल्या तारखेला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६२५०० रुपये (विनाजीएसटी) इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ७१५०० रुपयावर होता. मात्र मध्येच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंचे दर वाढले. सोन्याच्या किमतीने ६६ हजाराचा ऐतिहासिक पल्ला गाठला. मागल्या गेल्या १७ दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ३५००हजार रुपयांहून अधिकची वाढ झाली. दुसरीकडे चांदीच्या दरात ४५०० हजार रुपयांपेक्षा अधिकची वाढ झालीय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button