---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदवार्ता ; एकाच दिवसात मोठी घसरण, पहा नवीन दर??

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२३ । सोने-चांदीने खरेदीदारांसाठी आनंदवार्ता आहे. ती म्हणजे मागील काही दिवसापासून वाढणाऱ्या किमतीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज गुरुवारी पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात सोन्याच्या कितमीत घसरण झालेली दिसून येत आहे. सोबतच चांदी देखील घसरली आहे. भावात सातत्याने चढउतार होत असला तरी गेल्या पंधरवाड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतली नाही. या पडझडीचा ग्राहकांना फायदा घेता येईल. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव ७० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळ्याचा सोन्याचा दर ६०,०७४ रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत 230 रुपयाची घसरण झाल्यानंतर चांदीचा एक किलो दर ७२,४३० रुपयावर व्यवहार करत आहे.

---Advertisement---

जळगाव सुवर्णनगरीतील आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,०००रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी सोन्याचा दर ६१,५०० रुपयावर होता. त्यात आता म्हणजेच ५०० रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७२,५०० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. काल सकाळी चांदीचा दर ७३००० रुपये किलो इतका होता. चांदी देखील ५०० रुपयांनी घसरलेली दिसून येत आहे.

सोने-चांदीचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे.

उच्चांक पातळीपासून चांदीचा दर जवळपास ४८०० ते ५००० रुपयांनी घसरला आहे. सोने देखील घसरले आहे. उच्चांक पातळीपासून सोनं १००० ते १२०० रुपयांनी घसरले आहे. मात्र येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. तसेच चांदी देखील लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---