Gold Silver Today ; चालू आठवड्यात सोने-चांदी स्वस्त की महाग? घ्या जाणून

जून 18, 2022 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । मागील काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात चढ-उतार सुरु आहे. या चालू आठड्यात सोन्याच्या भावात किंचित ५० रुपयाची घसरण दिसून आली तर दुसरीकडे चांदीच्या भावात वाढ दिसून आलीय. चांदी भावात १५० रुपयापर्यंतची वाढ झाली. जळगाव सराफ बाजरात एका तोळ्याचा भाव ५२,१८० रुपये इतका आहे. तर चांदी ६२,९७० रुपये प्रति किलोवर इतकी आहे.

gold silver rate 3

तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात.या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते. शुद्धतेनुसार सोन्याच्या (Gold purity) किंमतीत पुन्हा बदल होतो. ग्राहकाला या नवीन दराप्रमाणे सोने-चांदी खरेदी करता येते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याचे पडसाद जगभरातील भांडवली आणि कमॉडिटी बाजारावर उमटले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १३ जून रोजी सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदवली गेली होती. त्यादिवशी सोने ७१० रुपयाची वाढ झाली होती. तर दुसरीकडे चांदी ५३० रुपयाने महागली होती. मात्र त्यांनतर दोन दिवस सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली झाली होती.

मंगळवार सोने १०६० रुपयाने तर बुधवारी ४८० रुपयाने स्वस्त झाले होते. या दोन दिवसात सोन्याचे भाव जवळपास १५५० रुपयापर्यंत घसरले होते. तर दुसरीकडे चांदी २२०० रुपयापर्यंत घसरले होते. त्यामुळे चांदी पुन्हा ६१ हजाराच्या घरात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसात चांदीच्या भावात २०७० रुपयाची वाढ होऊन चांदी पुन्हा ६३ हजाराच्या उंबरवठ्यावर पोहोचली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम
१६ जून २०२२ – रु ५१,६२० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो
१६ जून मे २०२२- रुपये ६२,१२० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now