⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

सोने-चांदीने दिलासा खरेदीदारांना मोठा दिलासा ; ‘इतका’ आहे 10 ग्रॅमचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२४ । सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्यात तीन दिवसात भाव उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. डिसेंबर महिन्यात किंमतींनी उच्चांक गाठल्याने खरेदीदारांना घाम फुटला होता. मात्र आता दिलासा मिळत असल्याने खरेदीसाठी बाजारात लगभग सुरु आहे.

नवीन वर्षात 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव उतरला. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. तर या आठवड्यात 15 जानेवारीला सोन्याच्या किंमती 150 रुपयांनीवाढल्या. 16 जानेवारीला 100 रुपयांनी भाव उतरले. तर 17 जानेवारी रोजी 350 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 10 जानेवारीला चांदी 600 रुपयांनी महागली. 11-12 जानेवारी रोजी भाव स्थिर होते. 13 जानेवारीला 500 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्यात 15 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली. तर 16 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी 76,500 रुपये आहे.