⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । सोने आणि चांदीचा (Gold-Silver Price)भाव दिवसागणीक वाढत आहे. मागील आठवड्यात सलग चार दिवस सोने आणि चांदीचे भाव वधारले. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात १०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ४४० रुपयाची घट झाली आहे.

काय आहे आजचा प्रति तोळ्याचा भाव?
सोमवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,२३० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,६५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

कोरोनाची चौथी लाट पुन्हा संकट वाढवणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शांघाईने विमान सेवा खंडीत केली असून चीनमध्ये लाॅकडाऊन आणखी कठोर करण्यात आला आहे. तर रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरुच आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींनी सोने आणि चांदीला मात्र तेजीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या आठ्वड्यात सोने १२०० ते १३०० रुपयांनी महागले. तर दुसरीकडे चांदी २७०० ते २८०० रुपयांनी महागली. या दरवाढीने सोने दर ५४ हजारापुढे गेले आहे. तर चांदीने देखील ७० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते. गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ११ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,२९० रुपये होते. १२ एप्रिल रोजी ५३,४००, १३ एप्रिल रोजी ५४,१२०, तर १४ एप्रिल ५४,३३० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे ११ एप्रिल रोजी चांदी दर ६८,५६० प्रति किलो होती. १२ एप्रिल ६८,८७०, १३ एप्रिल ७०,४०० तर १४ एप्रिल ला ७१,०९० प्रति किलो इतका होता.

सोन्याची प्युअरीटी कशी तपासावी?
सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.