⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

चांदीने घेतली पुन्हा मोठी झेप, सोनेही महागले ; पहा नवे दर…

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate Today) किमतीत चढउताराचे सत्र सुरूच आहे. दिवाळीनंतर सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सत्राच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंच्या किमती महागल्या आहे. सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीने पुन्हा मोठी झेप घेतली आहे. पहा आजचा नवीन दर काय आहेत…

MCX वरील आजचा सोने चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 84 रुपयांच्या वाढीनंतर, सोने 60,806 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदी 0.3 टक्क्यांनी म्हणजेच 20 रुपयांच्या वाढीनंतर 73,380 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

ऑक्टोबर महिन्यानंतर मौल्यवान धातूमध्ये चढउताराचे सत्र आहे. मात्र, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात या मौल्यवान धातूंनी कमाल कामगिरी केली नाही. एका विशिष्ट किंमतीत दोन्ही धातूत चढउतार होत आहे. पण गेल्या दिवाळीपेक्षा या दिवाळीत किंमतीत वाढ झाली आहे.

या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. आता 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याने माघार घेतली असली तरी चांदी महाग झाली.11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ दिसली. एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.