⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

खुशखबर! दीड महिन्यानंतर सोन्याचे दर आला ‘इतका’ खाली, खरेदीबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. दीड-दोन महिन्यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा ६० हजार रुपयांच्या खाली आले आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणखी कमी होतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. Gold Silver Rate

जळगाव सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये प्रति तोळा इतका आहे. मंगळवारी ६० हजार रुपयांवर असलेले सोने बुधवारी ४०० आणि गुरुवारी २५० रुपयांनी घसरून ५९ हजार ३५० रुपये प्रति तोळा झाले. हे दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढती मागणी आणि अमेरिकन बँकांनी व्याजाचे दर घटवल्याच्या परिणामासह काही प्रमुख बँका बंद झाल्याने सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६२ हजार रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. त्यानंतर सोने दर घसरताना दिसून आले.

१ जून रोजी ६० हजार ६०० रुपये प्रति तोळा असलेले सोन्याचे दर १३ जून रोजी ६० हजार रुपये होते. बुधवार आणि गुरुवारीही दरातील घसरण सुरूच होती. बाजारपेठेतील मागणीतील घटीमुळे आगामी काळात देखील सोन्याचे दर आणखी कमी होतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने ग्राहकांनी सोने खरेदीचे नियोजन करण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

चांदीचा दर काय?
सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ७२,००० रुपयावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी चांदीचा दर ७४,५०० रुपये विनाजीएसटी इतका होता. म्हणजेच त्यात आतापर्यंत २५०० रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.