जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर वर-खाली झालेले पाहायला मिळतंय. महिन्याच्या सुरुवातीला, सरकारने 1 जुलै रोजी आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली. 30 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. आयात शुल्कात वाढ केल्यानंतर काही दिवस सोन्याच्या भावात वाढ दिसून आली होती. मात्र गेल्या काही सत्रात सोने दरात घसरण दिसून आलीय. Gold Silver Rate Today
जळगावमध्ये सध्या २४ कॅरेट सोन्याच्या भाव ५०,९०० रुपयावर आला असून अशाच स्थितीत सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. दरम्यान, एक किलो चांदीचा भाव ५६,५०० रुपयांवर पोहोचला आहे. सोने-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. पहिले दिवसा आणि संध्याकाळी दुसऱ्यांदा दर जाहीर केले जातात. भारतीय सराफा बाजारात शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता दररोज सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले जातात.
९९५ शुद्धतेचे सोने आज ५०,९०० रुपयांत, ९१६ शुद्धतेचे सोने ४६,३०० रुपयांनी विकले जात आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव ३७,९०० रुपयांवर गेला आहे तर ५८५ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज २९,५००रुपयांना विकले जात आहे. तसेच ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव आज ५६,५०० रुपये आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटताच जगभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सोने दरात प्रंचड वाढ झाली होती. मार्च २०२२ मध्ये सोन्याचा भाव ५५,६०० रुपयांवर गेला होता. तो आता जवळपास ५,००० रुपयांनी कमी झाला आहे.
२४, २२, २१, १८ आणि १४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेटचे सोने सर्वात शुद्ध सोने मानले जाते. त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नसते. त्याला ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६७ टक्के शुद्ध सोने आहे. इतर ८.३३ टक्के इतर धातूंचा समावेश आहे. त्याच वेळी २१ कॅरेट सोन्यापैकी ८७.५ टक्के शुद्ध सोने आहे. १८ कॅरेटमध्ये ७५ टक्के शुद्ध सोने असते आणि १४ कॅरेट सोन्यामध्ये ५८.५ टक्के शुद्ध सोने असते.