जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । आठवड्याची सुरुवात वाढीने झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज मंगळवारी सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंच्या दरात घसरण झालेली दिसून आली. मात्र भारतीय बाजारात अद्यापही सोन्याचा दर 63 हजारावर आहे. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती.. Gold Silver Rate 16 January 2024
MCX वर किंमत किती आहे?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सुमारे 100 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅम 62,467 रुपये झाला. तर चांदीच्या दरातही सुमारे 150 रुपयांची घसरण झाली आणि एमसीएक्सवर चांदीची किंमत 72,488 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जळगावमधील दर
22 कॅरेट सोने 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर दुसरीकडे चांदीचा दर 74000 रुपये प्रति किलो इतका आहे. मागील आठवड्याभरात दोन्ही धातूंचे दर वाढले आहे. गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात 300 ते 400रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 1000 रुपयांची वाढ दिसून येतेय.